मोठ्या बहिणीनंच छोट्या १२ वर्षीय बहिणीचा केला खुन , मृत देह घरातील एका रुममध्ये दफन केल्याचा धक्कादायक प्रकार..

अनामित

[ads id='ads1]

उत्तर प्रदेश (UP) - बाराबंकी फतेहपूरच्या खन्ता मजरे गावात असलेल्या मोठ्या बहिणीनच लहान बहिणीसोबत झालेल्या भांडणातून तिचा खुन करुण मृतदेह पोत्यात बांधून घरातील एका रुममध्ये दफन केला. मृत बहिणीचे वय १२ वर्षीय होते या लहान बहिणीची रॉड मारून तिची हत्या केली होती.  घरातील लहान मुलगी २ दिवसांपासून बेपत्ता असल्याने घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सर्वत्र तिचा शोध घेतला जात होता मात्र 

[ads id='ads2]

बाहेर काहीही शोध लागेना,मात्र २ ते ३ दिवसाने घरातच दुर्गंधी येऊ लागली त्यानंतर त्या जागेवर खोदकाम करुण माती काढण्यात आली तेव्हा पोत्यात बांधलेला वय १२ वर्षीय गायत्री चा मृतदेह आढळून आल्याने तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 



पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमोर्टमला पाठवला. तर त्याचवेळी आरोपी मोठी बहीण घटनास्थळावरून पसार झाली आणि मोठ्या बहिणीची क्रुरता समोर आली,या घटनेने फतेहपूरच्या खन्ता मजरे गावात बाराबंकीमधील फतेहपूर कोतवाली क्षेत्रातील गावातील या घटनेने अनेकांनच्या काळजाला धक्का बसला. 


ही घटना बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेचा खुलासा तिसऱ्या दिवशी शुक्रवारी उघडकीस झाला. तर गावातील रहिवासी कल्लू रावत हे मजुरीचं काम करायचे. मजुरीच्या निमित्ताने ते नेहमी घराच्या बाहेर असायचे. मजुराच्या मोठ्या मुलीचं किरणसोबत लग्न झालं होतं. परंतु काही दिवसांनी सासरहून परतून मुलगी माहेरी येऊन राहत होती. घरात १२ वर्षीय छोटी मुलगी गायत्रीही राहत होती. बुधवारी रात्रीपासून गायत्री बेपत्ता झाली होती.


बहिणीचा शोध घेत असताना घरातील एका रुममध्ये दुर्गंधी येत असल्याने पाहिलं असताना पोत्यात बांधलेल्या अवस्थेत गायत्रीचा मृतदेह आढळला. बुधवारी रात्री गायत्री आणि मोठ्या बहिणीत वाद झाला होता. त्या वादातून मोठ्या बहिणीने लहान बहिणीवर हल्ला केला. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली. यानंतर घरातील एका खोलीत जमीन खोदून मृतदेह पोत्यात बांधून दफन केला. 


घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना बोलावलं. तोपर्यंत संधीचा फायदा घेऊन मोठी बहीण फरार झाली लवकरच पोलिस आरोपीला अटक करतील असे सांगण्यात आले आहे.  

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!