विद्यार्थिनीची छेड काढणं मुख्याध्यापकाला पडलं चांगलंच महागात...

अनामित

बिहार - कटिहार जिल्ह्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकावर आपल्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मुख्याध्यापकाला अटक करण्यात त्यांना यश आलं आहे , जिल्ह्यातील सीमापूर परिसरातील पिपरी बहियार प्रायमरी स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीसोबत मुख्याध्यापकाने चुकीचं वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या गालाचा चावा घेतला.

[ads id='ads1]

त्यामुळे मुलगी जोरात किंचाळली. आणि ओरडल्याने तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक रुमच्या दिशेने धाव घेतली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर शाळेबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले . लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.


एका Hindi Website च्या माहितीनुसार आरोपीला घेऊन जात असताना बाहेर जमलेल्या जनतेने आरोपीवर अचानक हल्ला केला. आणि पोलिसांच्या समोरच आरोपी मुख्याध्यापकाला काठीने बेदम मारहाण करत त्याची धुलाई केली.


असे व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यानंतर लोकांच्या तावडीतून पोलिसांनी मुख्याध्यापकाची सुटका करुन पोलिसांत नेण्यात आले. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!