शिरपूर - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जळगांव येथील डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूत निलेश देवरे यांनी कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे थाळनेर ता.शिरपूर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.
[ads id='ads1]
यावेळी कृषिदूतांनी कीटकनाशके व बुरशीनाशके फवारणी कशी करावी?फवारणीचे द्रावण कसे तयार करावे?फवारणी करताना तोंडाला मास्क,डोक्याला टोपी ,हात मोजे, डोळ्याला गॉगल वापरावे व मित्र किडींबद्दल माहिती त्यांनी शेतकऱ्यांना समजवून सांगितले.तसेच निंबोळी अर्क बनवण्याची कृती, निंबोळी अर्क कसा तयार करावा या संबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी व प्रतिष्टीत नागरिकांनी त्यांच कौतुक केले.यासाठी त्याला डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य. शैलेश तायडे सर, उपप्राचार्य.पी.एस. देवरे सर,कार्यक्रम समनव्यक प्रा.ए. डी. फाफळे सर, प्रा.व्ही.बी.दळवी सर (कृषी किटकशास्त्र),प्रा.मते मॅडम, कार्यक्रम अधिकारी व्ही.एस. राणे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.