[ads id='ads1]
रावेर (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील मागील काही दिवसांपूर्वी ग्रामीण राज्य स्वसंस्था यांच्या मार्फत घेण्यात आलेली माझी वसुंधरा अभियान हि स्पर्धा घेण्यात आली होती यात रावेर तालुक्यातील चिनावल हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकावर आली यात राज्य सरकार कळून स्वच्छता अभियानात चिनावल ला राज्यात तिसरा क्रमांक देण्यात आला होता.
या अभियानांतर्गत चिनावल मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आला होता .तरी या गावातील अशी काही जागा दिसत नाही जागोजागी साचलेले सांडपाणी गटारी रस्त्यावर चिखल आहेत तर इतकेच नाही डासांचे माहेर घरच म्हटले तरी चालेल! जवळच असलेल्या सावदा शहरात दवाखाने मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू सारख्या आजारांची रुग्ण संख्या वाढतेय यातच असेंच चालु राहीले
या माझी वसुंधरा अभियानांतर्गत हगणदारीमुक्त गाव पण होता तरी याची उलट दिशा दिसत आहे. जागोजागी रस्त्यावर उघड्यावर सौच दिसून येत आहे, या मुळे गावात रोगरोगाई पसरण्याची भिती दाट शक्यता नाकारता येणार नाही.
