रावेर प्रतिनिधी राजेंद्र अटकाळे
शासनाने रावेर निवासी नायब तहसीलदार म्हणून संजय तायडे यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. दरम्यान, यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांची रावेरवरुन भुसावळ बदली झाली होती.
रावेर तहसिल कार्यालयात रिक्त असलेल्या पदावर भुसावळ येथील निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांची नियुक्ती झाली आहे. अतिशय शांत स्वभावाचे श्री तायडे यांनी लगातार दोन वर्ष रावेर महसूलचा शंभर टक्के वसूली केली होती म्हणून त्यांचे नाव जिल्हाभरात गाजले होते. रावेरात असतांना त्यांनी महसूल वसूली..निवडणुकांमध्ये उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांचा जिल्हाधिका-यांनी सन्मान देखिल केला होता.
त्यांच्या कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समाधना करणे हीच त्यांची ख्याती होती.रावेरातुन बदली झाली तेव्हा अनेक गरीब जनतेला अश्रु अनावर झाले होते. अखेर संजय तायडे यांना जनसेवा करण्यासाठी शासनाने पुन्हा रावेर येथे पाठवले आहे.


