जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववी प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास प्रारंभ

अनामित

वाशिम : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली द्वारा घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी निवड चाचणी परीक्षेचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मान्यताप्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेले विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतील, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. डी. खरात यांनी कळविले आहे.
[ads id='ads1]

इच्छुक विद्यार्थ्याचा जन्म १ मे २००६ ते ३० एप्रिल २०१० दरम्यान झालेला असावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संवर्गासह सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना ही अट लागू आहे. अधिक माहितीसाठी तसेच परीक्षेचे स्वरूप, इतर विस्तृत विवरण नवोदय विद्यालय समितीच्या www.navodaya.gov.in किंवा www.nvsadmissionclassnine.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


तसेच ऑनलाईन सुध्दा याच संकेतस्थळावर १३ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत विनामुल्य उपलब्ध आहेत. निवड चाचणी परीक्षा ९ एप्रिल २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याचे श्री. खरात यांनी कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!