मुंबई - APMC मधील दाणाबंदर परिसरातील गटाराच्या आत प्लास्टिकच्या पिशवीत एका अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. पिशवीत केवळ हात व पाय होते मात्र उर्वरित धड व शिरचा पोलीस तपास करत आहेत. सदर परिसरात दिवसा मोठी वर्दळ असते त्यामुळे रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.[ads id='ads1]
एपीएमसीमधील (APMC) दानाबंदर ते माथाडी भवन दरम्यानच्या मार्गाजवळ असलेल्या गटारीत हे मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. त्याठिकाणी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोधाशोध केली असता एका गरामध्ये प्लास्टिकची पिशवी आढळून आली आणि ही पिशवी पोलिसांनी उघडली मग त्यामध्ये अका अज्ञात व्यक्तीचे हात व पाय आढळून आले आहेत मात्र यावरून सदर व्यक्तीची हत्या करून पुरावे नष्ट करून ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे त्याठिकाणी टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हाती लागलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांवरून मृत व्यक्तीचे वय सुमारे अंदाजे ३० किंवा ४० वर्षे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात काळा धागा आहे.
पण अवघ्या हात व पायाच्या तुकड्यावरून त्याची ओळख पटवण्याची आव्हान पोलिसांपुढे आहे. मात्र मृतदेहाचे उर्वरित तुकडे कुठे टाकले असावेत याच्या शोधासाठी एपीएमसी (APMC) पोलीसांनी परिसर पिंजून काढला.मात्र तरीही काहीच हाती लागले नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान तयार झाले आहे. पिशवीतून आणलेले मृतदेहाचे तुकडे रात्रीच्या सुमारास त्याठिकाणी टाकले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे . यानुसार CCTV माध्यमातून या मार्गाने प्रवास केलेल्या वाहनाचा पोलीस तपास करीत आहेत.
त्याशिवाय शहरातून एखादी व्यक्ती बेपत्ता आहे का याचाही तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकासह श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत. या घटनेच्या अनुशंगाने एपीएमसी पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
