रावेर तालुक्यात मराठी सिनेअभिनेता राहुल पाटील यांची सपन सपन या सुपरहीट मराठी साँग मध्ये उत्कृष्ठ भुमिका

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर - तालुक्यात चित्रीत झालेल्या 'सपन सपन' या मराठी साँगला प्रेषकांची पसंती मिळत आहे. या साँगमध्ये अभिनेते राहुल पाटील हे मराठवाड्यातील लातुरचे असुन त्यांनी चित्रपट सृष्टीत  काम केले आहे. त्यांचे आजपर्यंत 6 चित्रपट व अनेक म्युझिक अल्बमस् रिलीज झाले आहे. ज्यात त्यांनी मुख्य भुमिका साकारली आहे. [ads id="ads1"] 

  त्यांनी सोनु निगम, आनंद शिंदे, आर्दश शिंदे अश्या अनेक सुप्रसिध्द गायकांनी गायलेल्या साँगवर मुख्य अभिनेत्वाची भूमिका करून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. आताच त्यांचा नविन सिनेमा "आम्ही बेफिकर' हा झी युवा वा वाहीनीवर सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सपन सपन' हे मराठी साँगमध्ये त्यांच्या सोबत आश्विनी गोपाले वा मुंबईच्या अभिनेत्रीने अतिशय उत्कृष्ट सहकार्य करत साँगला रावेर तालुक्याच्या हिरवळते सारख बहरुन ठेवलं आहे. 

   'सपन सपन' या साँगचे दिग्दर्शक व गीतकार अमित वसंत गुरव हे स्वःता रावेर तालुक्यातील सिंगनुर गावचे असुन वा साँगला संगितमय करण्याचे अनमोल असे कार्य फैजपुर येवील रहीवासी असलेले श्री पियुष भिरुड यांनी केले आहे. साँगचे छायांकन हे रावेर येथील शाहरुख तडवी यांनी केले असुन त्यांना सहकार्य हे वसिम अकबर तडवी यांनी केले आहे. 


साँगची निर्मिती व्यवस्था ही विटव्याचे रॉकी अढागळे यांनी केली आहे. 'सपन सपन' सांगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असुन प्रेषकांमध्ये व जळगाव जिल्ह्याच्या तरुण वर्गामध्ये आता खेड्या पाड्यांमध्येही अतिशय सुंदर सॉंग बनवुन 'झी म्युझिक मराठी' या सारख्या जग प्रसिद्ध युटूब वाहीनीवर देता येईल वांचा आनंद आहे. नविन तरुण जे चित्रपट सृष्टीत काही करण्याची धमक ठेवतात अश्या तरुणांचे मनोबल वाढवणारे असे हे कार्य आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!