
निंभोरा बु ता.रावेर (प्रमोद कोंडे) निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये स. पो. नि. स्वप्नील उनवणे, पो. नि. काशिनाथ कोळंबे यांच्या मार्गदर्शना खाली शांतता कमेटीची बैठक दि.१६ गुरुवार रोजी संद्याकाळी आयोजित करण्यात आली. या बैठकीत स्वप्नील पाटील यांनी सर्व गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना वाचून दाखविल्या. विना वाजत्री दुपारी दोन वाजेपर्यंत शांततेत गणेश विसर्जन करण्याच्या सूचना करण्यात आल्या.शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला शांतता समितीचे सहकार्य मिळणे आवश्यक, तसेच महत्वाचे असते.असे निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी शांतता कमेटीच्या बैठकीत प्रतिपादन केले. [ads id="ads1"]
निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत २९ गावांमधील एकूण ९५ श्री. गणेश मंडळे नोंदणीकृत असून गेल्या ५ वर्षात निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत श्री. गणेश उत्सव काळात एकाही गुन्ह्याची नोंद नसल्याचे सांगत गावागावातील शांतता समित्या, ग्राम प्रशासन, पत्रकार व विविध प्रतिनिधीच्या सहकार्याचे हे फलित असल्याचे स.पो.नि. स्वप्नील उनवणे यांनी सांगितले. [ads id="ads2"]
श्री.गणेश मंडळाच्या व शांतता कमेटीच्या बैठकीस माजी सरपंच, तथा नूतन तंटामुक्ती अध्यक्ष डिगंबर चौधरी, निंभोरा गावाचे प्रथम नागरिक सरपंच सचिन महाले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भाऊ बोंडे,माजी उपसरपंच सुभाष पाटील (महाराज ), माजी कृ. उ. बा.स.उपसभापती दुर्गादास पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तथा प्रेस रिपोर्टर प्रमोद कोंडे,राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सुनिल कोंडे. प्रतिष्ठित व्यापारी नरेंद्रजी ढाके, तसेच निंभोरा बु. ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील गिरडे,मनोहर तायडे, दिलशाद शेख,सतिश पाटील, प्रा. दिलीप सोनवणे, गोकुळ भोई सर, युनूस खान, मनोज सोनार, वाय.डी. पाटील, माजी ग्रा. सदस्य ज्ञानदेव नेमाडे, नितीन पाटील, ललित सोनार, पवन पाटील, शेख इकबाल, मजहर पटेल, किरण दोडके, गौरव बोंडे, मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य, निंभोरा पोलीस स्टेशन सहकारी राकेश वराडे, स्वप्नील पाटील उपस्थित होते.

