महिलांना क्रिकेटसह कोणताही खेळ खेळायला मिळणार नाही तालिबानच्या या निर्णयाचा पुरुष टीमसह राशिद खानला बसणार फटका..!

अनामित
तालिबाननं महिलांवर घातलेली बंदी खरी असेल तर या वर्षी होबार्टमध्ये होणारी टेस्ट मॅच रद्द करण्यात येईल ऑस्ट्रेलिया चे स्पष्ट उत्तर 

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं आता खरा रंग दाखवायला सुरूवात केलं आहे.तर आता महिलांना क्रिकेटसह कोणताही खेळ खेळायला मिळणार नाही असे तालिबाननं स्पष्ट केलं आहे. तालिबान अश्या पद्धतीचा निर्णय घेईल याची भीती यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. तर तालिबानच्या या निर्णयाचा फटका अफगाणिस्तानच्या पुरुष क्रिकेटटीमला बसणार आहे.
[ads id='ads1]
तालिबाननं महिलांवर घातलेली बंदी खरी असेल तर या वर्षी होबार्टमध्ये होणारी टेस्ट मॅच रद्द करण्यात येईल असं क्रिकेट ऑस्ट्रेलिनं जाहीर केलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही एकमेव टेस्ट 27 नोव्हेंबरपासून रोजी होणार आहे. ही टेस्ट मागच्या वर्षीच होणार होती, पण कोविड-१९ मुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता. दोन्ही टीममध्ये होणारी ही पहिली टेस्ट आहे.

'क्रिकेट हा सर्वांसाठी एक खेळ आहे. हा खेळ महिलांनी खेळावा अशी आमची भूमिका आहे. नुकतेच प्रकाशित झालेले मीडिया रिपोर्ट खरे असतील आणि अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटला पाठिंबा मिळणार नसेल तर ऑस्ट्रेलियाला होबार्टमध्ये होणारी टेस्ट रद्द करण्यावाचून पर्याय नसेल
 

या विषयावर आम्ही ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया सरकारला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करतो.' असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलं आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या महिलांना कोणत्याही प्रकारचा खेळ खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
तालिबानच्या संस्कृती आयोगाचे उपाध्यक्ष अहमदुल्लाह वसीक यांनी याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानच्या महिला कोणताही खेळ खेळू शकणार नाहीत, यामध्ये क्रिकेटचाही समावेश आहे, असं अहमदुल्लाह वसीक म्हणाले. 

'मला वाटत नाही महिलांना क्रिकेट खेळायला मंजुरी दिली जाईल. क्रिकेटमध्ये अनेकवेळा महिलांचा चेहरा आणि शरीर झाकलेलं नसतं. इस्लाम महिलांना याची परवानगी देत नाही,' 
असं तालिबानी नेते अहमदुल्लाह वसीक यांनी सांगितलं. अफगाणिस्तानच्या महिला टीमवर क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातल्यानंतर त्यांच्या पुरुष टीमचा टेस्ट टीमचा दर्जाही जाणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार ज्या देशाच्या महिला आणि पुरुष टीम खेळतात त्यांनाच टेस्ट टीमचा दर्जा देण्यात येतो.

 महिला टीममध्ये 12 सदस्य असणं गरजेचं असतं आणि अफगाणिस्तानने 2017 साली ही अट पूर्ण केली. मागच्याच वर्षी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 25 महिला क्रिकेटपटूंना करारबद्धही केलं होतं. अफगाणिस्तानच्या टीमला 27 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक टेस्ट मॅच खेळायची आहे, पण तालिबानच्या या निर्णयामुळे त्यांचा टेस्ट दर्जा हिरावला जाणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!