यावेळी शबाना रफिक तडवी यांनी वाचन हे जीवन समृद्धीसाठी असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या दर्जाचे वाचनापासून वंचित आहेत. अशी खंत व्यक्त केली. वाचना आभावी संस्कार आणि नागरी जीवनापासून ते दूर आहेत. तसेच ते स्पर्धा परीक्षा, नोकरीची संधी यापासून सुद्धा दूर आहेत. असे मत व्यक्त केले. [ads id="ads2"]
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. एन.एन. लांडगे यांनी वाचन संस्कृती आणि जीवन विकास यामधील रा.से. यो. चे घनिष्ठ संबंध यावर विवेचन केले.ग्राम वाचनकट्टा हा याच उद्देश आणि पैकी एक उपक्रम आहे. असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एस.टी. भुकन यांनी `वाचाल तर वाचाल´ हा विचार सर्वांसमोर मांडला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जर वाचनाची सुविधा उपलब्ध झाली तर ते ही जगाच्या पाठीवर कुठेही कमी पडणार नाहीत. हा विश्वास विद्यार्थी आणि पालकांना दिला. प्राचार्यांनी महाविद्यालयामार्फत काही पुस्तके गौरखेडा येथे सुरू करण्याचे आश्वासन दिले. प्राध्यापक डॉ.बी. जे.मुंढे ( राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले. सदरील कार्यक्रमासाठी मौजे गौरखेडा येथील उपसरपंच मंगलाबाई बाबूलाल महाजन, गफूर शेठ हसन तडवी, पोलीस पाटील कैलास खंडू महाजन, सुमित्राबाई विनोद भालेराव तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी डॉ. प्रतिभा सूर्यवंशी, श्री अविनाश सोनवणे, भरत जाधव, सलीम तडवी उपस्थित होते.