याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील जवळ जवळ दिड महिन्यापासून पावसाचा जोर कायम असून विद्युत पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊन अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होत आहेत.तामसवाडी ता.रावेर येथे देखील हा पावसाचा जोर कायम असून शुक्रवार दिनांक २४/०९/२०२१ रोजी दुपारच्या सुमारास संततधार पावसामुळे शॉर्ट सर्कीट होऊन विद्युत रोहित्रात बिघाड होऊन ते निकामी झाले.त्यामुळे शुक्रवार रोजीच्या दुपार पासून येथे विद्युत पुरवठा खंडित होऊन येथे अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले होते.[ads id="ads2"]
आधिच तामसवाडी ता.रावेर परिसरात अतिपावसामुळे काढणीला आलेला कापुस गळून पडत आहे ज्वारी मका आणि खरीपाच्या जवळपास सर्वच पिकांचे भविष्य धोक्यात असून ईथला शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे.चालू असलेली महामारी तसेच गावातील घन कचरा व सततच्या पावसामुळे जागोजागी साचलेले डबके सदृश पाणी यामुळे गांव परिसरात डासांची पैदास झपाट्यात वाढत आहे, व त्यामुळे डेंग्यू,मलेरीया,चिकन गुणिया,टायफॉइड सदृश विविध आजारांमुळे लोकं त्रस्त असून जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.अशाप्रकारे विविध समस्यांनी ग्रामस्थांना घेरलेले असतांनाच दुष्काळात तेरावा महिना हे विद्युत रोहित्र निकामी होऊन सगळीकडे अंधाराचे साम्राज्य माजले.
मात्र असे असले तरी ग्राम प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ दखल घेत शुक्रवार पासून ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य कर्मचारी तसेच विद्युत पुरवठा कर्मचारी सर्वांनीच युध्दपातळीवर प्रयत्न करत आज दुपारचे सुमारास नविन विद्युत रोहित्र बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.