पुणे - पिंपरी चिंचवड येथील महिला डॉक्टरची (Doctor) तलाठी असणाऱ्या पतीने खुन केल्याची घटना समोर आली आहे. ही केवळ अनैतिक संबंधाच्या संशयातून ही खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशी चिठ्ठी आरोपी पतीने हत्यपूर्वी लिहून ठेवली आणि फरार झाला आहे.
[ads id='ads1]
सरला साळवे असं महिला डॉक्टरचे नाव होते. त्या पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये सहा महिन्यांपासून काम करत होत्या. तसेच मोशीत खाजगी रुग्णालय देखील चालवत होत्या. तर आरोपी तलाठी विजयकुमार साळवे हा पुण्याच्या जुन्नर तालुक्यात कार्यरत आहे. पत्नीचे नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टरशी विवाहबाह्य संबंध आहेत, असा विजयकुमारला संशय होता आणि त्यातूनच त्याने पत्नी सरालाची हत्या केली.
तसं आरोपी विजयकुमारने एका चिठ्ठीत लिहून ठेवलं आणि तो पसार झाला असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली. तर हे एक दिवस आधी ज्या घराची वास्तुशांती करत गृहप्रवेश केला होता त्याच राहत्या घरात डॉ.सरला यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आवस्थेत आढळुन आला.मृतदेहाशेजारी लोखंडी हातोडा आणि चाकू देखील आढळून आला आहे अशी माहिती भोसरी MIDC पोलिसांनी दिली.
मोशी येथील युटोपीया सोसायटीच्या नवव्या मजल्यावर हे दाम्पत्य राहत होते. दि 4 सप्टेंबरपासून या दोघांचाही कोणाशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे दिनांक 6 सप्टेंबरला पोलिसांच्या मदतीने डुप्लिकेट (Duplicate) चावीच्या साह्याने घराचे दार उघडले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि दोन वर्षांचा संसार संपुष्टात आला.
