रावेर तालुका वार्ताहर (राजेश रायमळे) तामसवाडी ता. रावेर येथे आजपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त उत्साहपूर्ण आणि शांततेत गणपती मुर्तीची प्रतिस्थापना करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की,तामसवाडी ता.रावेर येथे एक गांव एक गणपती या संकल्पनेवर गावातील जयदुर्गा लेझीम मंडळाच्या वतीने मात्र एक गणपतीची स्थापना करण्यात आली.
[ads id='ads1]
मात्र तिन ते चार फुट उंच गणेश मुर्ती असून कोविड १९ चे अनुषंगाने शासनाकडून प्राप्त परिपत्रकानुसार व शासकीय निर्देशानुसार नियमांचे पालन करत कुठल्याही प्रकारे गर्दी अथवा मिरवणूक न काढता अगदी साधेपणात गणपतीची स्थापना करण्यात आली.यावेळेस बंदोबस्तासाठी असलेले गृहरक्षा दलाचे रामू अशोक सोनवणे, रविंद्र अशोक सोनवणे आणि तामसवाडी ता.रावेर गांवचे पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे उपस्थित होते.
