रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) तालुक्यातील विवरे बु. बनले समस्यांचे माहेर घर... विवरे बु. बस्टँड जवळ येथील भाटखेडा रोड शेतकरी बेघर प्लॉट तांडा व लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून समस्यांना सामोरे जावे लागत आहे .गेल्या अनेक वर्षापासून भाटखेडा रोड ची दुरवस्था झालेली आहे
[ads id='ads1]
नागरिकांनी गेल्या दहा ते बारा वर्षा पासून हा प्रश्न ग्रामपंचयत कडे तोंडी स्वरूपात आणि लेखी स्वरूपात निवेदनात विवीध विषयसमस्या मांडला आहे परंतु आता पर्यंत या रस्त्याची दखल घेण्यात आली नाही ग्रामपंचायती कडे लोक गेले असता लोकांना फक्त उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले आणि देत आहे तो रस्ता आमच्या हद्दीत येत नाही तुम्ही जिल्हा परिषद कडे जा असे सांगुन ग्रामसेवक व सरपंच यांच्या कडून ग्रामस्तांना नैराश्य उत्तरे मिळाले आहे.या परिसरात नागरिकांना शौचालये नाही ,गटारी नाही चांगले रस्ते नाही लोक उघड्यावर शौचाला बसत असतात त्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे
लहान मुले शाळेत जाणारे मुल यांना जाण्या येण्यास मोठी कसरत करावी लागते रात्रीच्या वेळी जिवधोक्यात घालून नागरिक ये जा करीत असतात आता पर्यंत निवडून आलेल्या प्रतिनिधींनी गावाचे बारा वाजविले विकास कामे मार्गी लावलेली नाही आणि आता नविन प्रतिनिधी काय करता याच्या कडे लोकांचे लक्ष लागुन धरले आहे या पाच वर्षात किती कामे मार्गी लावतील व किती समस्यांचे निवारण होईल किंवा नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे
