स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या,हडपसर परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप राहणार्‍या जोडप्यामध्ये किरकोळ कारणावरून प्रियकराचा प्रेयसीकडून खून

अनामित
हडपसर - फुरसुंगी भागात लिव्हइन रिलेशनमध्ये राहणारे तरुणाची तरुणीने खुन केल्याची धक्कादायक घटना घडली तर या लिव्ह इन रिलेशनशिप राहणार्‍या जोडप्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता या भांडणामध्ये प्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत प्रियकर सोनल पुरुषोत्तम दाभाडे (वय 34) आणि आरोपी तरुणी रोहिणी रामदास युनाते (वय 24) अशी दोघांची नावे आहेत.
[ads id ='ads1]
 तर प्रेयसीला याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना झालेल्या ओळखीचे रुपांतर हे दोघे तरुण तरुणी लिव्ह इन रिलेशनशिप राहत होते. दोघांमध्ये किरकोळ कारवारून वाद होत असल्याने तरुणीने रागाच्या भरात तरुणाचा खून केला. हडपसरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलीसांच्या तपासानंतर आणि शवविच्छेदनानंतर तरुणीने हा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिलेल्या सुत्रांच्यामाहितीनुसार, मयत सोनल हा मुळचा अमरावतीमधील आहे. 

तर रोहिणी ही बीड येथील आहे. त्या दोघांची ओळख स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने झाली होती आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही काळाने दोघे ही फुरसुंगी भागात एकत्रित राहण्यासाठी आले होते. मात्र त्या दोघांमध्ये मागील काही दिवसात क्षुल्लक कारणावरून वाद होत असत. वादाचे रुपांतर भांडणात होऊ लागलं. २९ ऑगस्ट रोजी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यावेळी रोहिणीने सोनलला भिंतीवर ढकलून दिले. 

त्यात सोनलच्या डोक्याला जबर मार बसला. त्यानंतर रोहिणीने सोनलचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर आरोपी रोहिणीला अटक करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!