गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी डॉक्टरकडून उकळले २५ हजार ; मिरज येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक लाच घेताना अटक.

अनामित
सांगली - मिरज येथे बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्ह्यात मिरज येथे असलेल्या डाॅक्टरांना आरोपी न करण्यासाठी चक्क तब्बल एकण रु २५ हजाराची लाच घेताना मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक समाधान वसंत बिले (वय ४२) मूळ  खोमनाळ,  जि. सोलापूर, हल्लीमुक्काम पोलीस कर्मचारी वसाहत, पंढरपूर रस्ता, मिरज यांना रंगेहात पकडण्यात आले. 
[ads id='ads1]
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. बिले याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी बेडग (ता. मिरज) येथे एकाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली होती. 


या अल्पवयीन मुली चा गर्भपात करून पोलिसांना माहिती न दिल्याने मिरजेतील दोन डाॅक्टरांनाही आरोपी करण्याची मागणी समाधान बिले यांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी यापैकी एका डाॅक्टरांकडे बिले याने एक लाखाची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीने २५ हजारात प्रकरण मिटविण्याचे ठरले होते. 


 असे जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांनी याबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने त्याची खात्री करून सापळा रचत बुधवारी रात्री सातच्या दरम्यान मिरज येथे हिरा हाॅटेल चाैकात रुईकर यांच्याकडून २५ हजार रुपये लाच घेतल्यानंतर बिले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करुन बिले यास अटक करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!