रावेर प्रतिनिधी : केऱ्हाळे खु. येथे राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत सदस्य सतीश निकम यांच्या प्रयत्नांतून धान्य वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी किसानसभा जळगांव जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर तालुका संघटक सतीश निकम व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.