न्हावी ग्रामपंचायत भ्रष्टाचार रुपी प्रश्नांची माहिती देण्यास प्रशासनाची टाळाटाळ,चौकशी व माहिती न मिळाल्यास बेमुद ठिय्या आंदोलन करणार भीम आर्मी

अनामित
न्हावी वार्ताहर (किरण तायडे) यावल तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या दलीत वस्ती सुधार योजने बोगस व निकृष्ठ कामे तसेच ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचारी कारभारातुन झालेल्या विविध विकास कामांची माहीती मिळावी या दृष्टीकोणातुन भिमआर्मीच्या वतीने मागील सात दिवसांपूर्वी म्हणजेच दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून निवेदन देण्यात आलेले होते, 
[ads id='ads1]
न्हावी तालुका यावल ग्रामपंचायतीला लाभलेल्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आजवर ६० लक्ष रुपयांच्या निधीतुन ग्रामस्तरावर यशवंत बोरोले यांच्या वाडयापासुन पवन मिस्त्री ( रोझोदा रोड ) यांच्या घरापर्यंत स्वच्छतेचा विचार करून वाढते घाणीचे साम्राज्य बघता ओतीव गटारीच्या झालेल्या कामांची माहीती तसेच महीला शौचालय , समाज मंदीर आदी कामांची सविस्तर माहिती तसेच ठरावीत झालेल्या कामांचे अंदाजपत्रक व आराखडा देऊन विविध प्रश्न घेऊन आम्ही आपल्या कडे निवेदन सादर केले परंतु सदर बाबी कडे ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ही सर्व जाणूनबुजून कानाडोळा करत आहे की असे आजवर दिसुन येत आहे . सदरची माहीतीची प्रशासन पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी व उपस्थित प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी “भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट यांच्या वतीने न्हावी येथील ग्रामपंचायती समोर दि.१५ सप्टेंबर रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, याची प्रशासन स्तरावर आपण नोंद घ्यावी व तात्काळ मागणीची पूर्तता करण्यास कार्यवाही करावी अशी विनंती असे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना व गटविकास अधिकारी यावल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . याप्रसंगी भीम आर्मीचे राज्य सचिव सुपडु संदानशिव, राज्यप्रवक्ता रमाकांत तायडे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे, भीमआर्मीचे यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे , तालुका महासचिव प्रशांत तायडे, यावल येथील भीम आर्मीचे सदस्य मंथन महीरे, बाबु सुरवाडे व न्हावी शाखा सदस्य छोटू कोचुरे आदी प्रमुख पदाधीकारी व कार्यकर्त या प्रसंगी उपस्थित होते . दरम्यान न्हावी ग्रामपंचायतच्या माध्यमातुन सर्व शासकीय नियम धाब्यावर ठेवुन विकासकामे करण्यात आली असुन , माहीती प्राप्त झाल्यावर सत्य समोर येईल असा विश्वास भीम आर्मीचे राज्य सचिव सुपडु संदानशिव यांनी व्यक्त केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!