यावल - डेंग्यू, मलेरिया डास प्रतिबंधात्मक उपाय योजना जिल्हा हिवताप अधिकारी देवराम लांडे व यावल-रावेर हिवताप पर्यवेक्षक विजय नेमाडे तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम चे आरोग्य अधिकारी डॉ.गौरव भोईटे यांनी मार्गदर्शना खाली डेंग्यू, मलेरिया डास प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून ग्रामपंचायतने औषधाची फॉींग मशिनद्वारे केली गावात धूर फवारणी केली तसेच डासांच्या नियंत्रणाकरिता ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नियोजन केले.
[ads id='ads1]
आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने पाउले उचलत फॉगिंग मशीनच्या माध्यमातून धुरळणी करण्यात येत आहे.तसेच धुरळणीमुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण येते. अगदी सायंकाळी गावात धुरळणी सुरू आहे. यामुळे गावात डासांची उत्पत्ती कमी होऊन रोगराई कमी करण्याकरिताधुरळणीचा वेग जेवढा अधिक तेवढे लांब धुरळणी करिता मदत होते. नुसत्या औषधांच्या वासाने डास कमी होण्यास मदत होते