रावेर येथे लोकन्यायालयात ७५ वर्ष वयाच्या आईला मिळाला न्याय

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथे आज दिनांक २५ सप्टेंबर शनिवार रोजी  राष्ट्रीय- लोकअदालतीचे आयोजन केले होते . यावेळी लोकन्यायालया मध्ये ७५ वर्षाच्या आईला तीन मुल असुन ते वागत नसल्याने आईने मुलांवरती खावटीची केस दाखल केली होती परंतु आज लोकन्यायालयामध्ये न्यायमुर्ती मा.श्री. अनंत बाजड साहेब, ॲड.श्री.व्ही. पी. महाजन, अँड रमाकांत महाजन व पॅनल पंच सदस्य अँड. श्री मेघनाथ चौधरी श्री राजेंद्र अटकाळे यांच्या मध्यस्तीने आई व मुलांचे मनोमिलन करण्यात आले. [ads id="ads1"] 

         मा अध्यक्ष, जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सो जळगाव यांचे निर्देशानुसार व तालुका विधी सेवा समिती रावेर यांचे विद्यमानाने व मा. श्री. अनंत एच. बाजड अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती रावेर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५/०९/२०२१ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय रावेर येथे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी कडिल प्रकरणांचे व दाखल-पुर्व प्रकरणांचे राष्ट्रीय-लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दिपप्रवज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.[ads id="ads2"]  

    यावेळी रावेर तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अँड.श्री.जगदिश एम. महाजन, उपाध्यक्ष अँड.श्री.एस. बी. सांगळे, सचिव अॅड. श्री.धनराज इ. पाटील ,अॅड.श्री.व्ही. पी. महाजन, अँड. श्री आर.एन.चौधरी, अँड.श्री.बी. डी. निळे, ॲड.श्री.प्रमोद विचवे, अँड.श्री .डी. डी. ठाकुर, अँड. श्री.तुषार चौधरी, अॅड.श्री.रमाकांत महाजन, ॲड.श्री.के. बी. खान, अँड.श्री.राकेश पाटील, अँड. श्री.पाचपोहे, अँड.श्री.गजरे, अँड. श्री धुंदले, अँड.श्री मुख्तार शेख, अँड. श्री जे.जी.पाटील, अॅड. श्री मुजाहिद शेख, अॅड, श्री सलीम जमलकर, अँड. श्री अमोल कोंगे, ॲड. श्री सतिष वाघोदे, ॲड.श्री समीर तडवी, अँड. श्री मेघनाथ चौधरी व इतर मान्यवर वकिल मंडळी उपस्थित होती. 

          लोकअदालतीत श्री अनंत. एच. बाजड, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती व दिवाणी न्यायाधीश क.स्तर रावेर, श्री. आर. एम. लोळगे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर. रावेर यांचे असे एकुण दोन पॅनल ठेवण्यात आले होते. रावेर न्यायलयातील एकुण ठेवण्यात आलेले ३०० प्रलंबित प्रकरणापैकी एकुण ५८ खटल्यांचा निपटारा करण्यात आला असुन त्यातील एकुण रक्क्म रुपये ७,०२,५,९९  वसुल करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीचे, महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे, भारत दुरसंचार निगमचे, रावेर नगरपालिकेचे, व बँकेचे ठेवण्यात आलेल दाखलपुर्व एकुण १०३७ प्रकरणापैकी एकुण १०६ प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातुन तडजोड रक्क्म रुपये ३८,०२,४,४५ वसुल करण्यात झाली.

  सदर लोकअदालतीचे पॅनल नंबर १ चे पंच सदस्य म्हणुन ॲडव्होकेट श्री. मेघनाथ चौधरी व श्री. राजेंद्र मधुकर अटकाळे, पॅनल नंबर २ चे पंच सदस्य म्हणुन अँड. श्री. समिर तडवी, व श्री. आशिष हुकुमचंद जहुरे यांनी काम पाहिले. सदर लोकअदालतीला रावेर वकिल संघाचे अध्यक्ष व न्यायलयीन कर्मचारी श्री ए. एम. सुगंधीवाले सहा.अधि., श्री.एम.जे. शिंपी स्टेनो, श्रीमती के. आर. वाणी मॅडम, श्री एस. आर. तडवी, श्री व्ही.डी.मोरे, श्री डी. व्ही राखुंडे, श्री.भरत एस. बारी, श्री डी. एस. डिवरे, श्री. के. बी. माने, श्री विश्वनाथ चौधरी, देवचंद आर जावळे,श्री एन. एम. पाटील, श्री.सतीष रावते, श्री. के. एस. पाटील, श्री विशाल नाथजोगी यांनी सहकार्य केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!