विवरे बु॥ तंटामुक्ती अध्यक्षपदी इस्माईल खा इब्राहिम खा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 विवरे ता रावेर ( संजय मानकरे ) विवरे बु॥ ग्रामपचायत कार्यालयासमोर झालेल्या ग्रामसभेत इस्माईल खा इब्राहिम खा यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे सरपंच युनुस तडवी यांनी सांगितले. इस्माईल खा इब्राहिम खां यांचे कडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर आमंत्रित सचिवपदी अमंत्रित पोलिस पाटील यांची निवड करण्यात आली . [ads id="ads1"]  

  यावेळी गावातील विविध विकास कामे , समस्या, समित्यांची निवड तसेच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच गावात लसीकरण शंभर टक्के व्हावे. यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच युनुस तडवी यांनी केले. विविध विप्पयांवरील चर्चेनंतर ग्राम सभा पार पडली.[ads id="ads2"]   यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेला सरपंच युनुस तडवी , उपसरपंच सौ भाग्यश्री पाटिल, माजी सरपंच वासुदेव नरवाडे , युसुफ खाटीक ,नौशादबी इस्माईल खा , रेखाबाई गाढे , ललिता पाचपांडे, विपीन राणे , दिपक राणे , विकास पाटिल, विनोद मोरे , निलीमा सणंसे, पुनम बोंडे, अरूण पाटील, चेतन पाटिल , गणेश सपकाळ, पंकज मोरे , ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते , जिप शाळेच्या मुख्याध्यापिका , शिक्षक, अंगणवाडी सेविका ,मदतनिस याच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       गावातील वादविवाद हे गावातच मिटावेत. शांतता प्रस्थापित व्हावी. या उद्देशाने ही समिती स्थापन करण्यात आली असून गावकऱ्यांचे सहकार्याने गाव तंटामुक्त करणार असल्याचा संकल्प असल्याचे मत तंटामुक्ती अध्यक्ष इस्माईल खा यांनी  पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!