रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) रावेर तालुक्यातील विवरे खुर्द शेती शिवारात आज दिनांक २७/०९/२०२१ रोजी वीज कोसळल्याने २४ वर्षीय विवाहिता ठार झाली आहे. [ads id="ads1]
विवरे खुर्द शिवारातील राजेंद्र पाटील यांच्या शेतात सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही वीज कोसळली, यामध्ये २६ वर्षीय शेतमजुर महिला मुरखीबाई इदा वागले हिच्या अंगावर वीज पडून ठार झाली आहे. [ads id="ads2"]
तर यावेळी तिची भाची रोशनी दरबार वागले (वय वर्ष -९), मुलगा राहुल इदा वागले (वय वर्ष-७) हे बुशद्ध पडले होते.ते जखमी आहे.यासोबतच ३ वर्षीय रविना इदा वागले हिला देखील विजेचा झटका लागल्याने तिच्या हात हा गंभीररीत्या भाजला आहे.यावेळी मृत महिलेचा पती देखील उपस्थित होता.त्याला कोणतीही इजा झालेली नाही. सदर घटनेमुळे विवरे गावावर शोककळा पसरली



