[ads id="ads2"]
मुंबई : पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी गुरुवारी 18 पोलीस उपायुक्तांच्या (डीसीपी) बदल्या केल्या.अधिकृत प्रसिद्धीनुसार, मुंबईतील 13 पोलिस झोनपैकी सहा झोनच्या डीसीपींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
[ads id="ads1"]
आयपीएस अधिकारी नीलोत्पल यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखेच्या डिटेक्शन-१ युनिटची, तर हरी बालाजी यांच्याकडे डीसीपी झोन-१ची जबाबदारी देण्यात आली आहे.
महेंद्र पंडित यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष टास्क फोर्सचे डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सौरभ त्रिपाठी यांची झोन-2, डीएस स्वामी यांची झोन-8, मंजुनाथ सिंघे यांची झोन-9 आणि सोमनाथ घार्गे यांची झोन-12 मध्ये बदली करण्यात आली आहे.
