त्या प्रसंगी रावेर कोर्टाचे सिनियर adv व्ही पी महाजन सर अध्यक्ष स्थानी होते,सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. आणि या वेळी law students नी यावेळी आपले मनोगत व्यक्त केलीत त्यात राजेश्वरी चौधरी यांनी मुलींच्या हक्क आणि समस्यांवर विचार मांडले यात त्यांनी प्रेरणादायी काव्य मुलींना सांगितले, त्याचप्रमाणे दीपिका पाटील यांनीही मुलींच्या कायद्याच्या बाबतीत माहिती दिली.[ads id="ads1"]
ऍड विद्या सोनार मॅडम, ऍड जगदीश महाजन सर अध्यक्ष रावेर वकिल संघ आणि संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पावर सर यांनी मुलींच्या जीवनातील समस्यांवर विचार प्रदर्शित केलेत आणि शाळेत विशाखा समिती स्थापन असते ती समिती मुलींच्या समस्यांवर काम करीत असते असं सरांनी सांगितले. विविध समस्यांवर सांगोपांग विचार विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले.
सदर प्रोग्रॅम मध्ये रावेर कोर्टचे सुगंधिवाले सर, बारी सर, बाळू पाटील, शाळेतील शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी मित्र आणि कोर्टाचे कर्मचारी उपस्थित होते, या ठिकाणी दिपक तायडे यांनी सूत्रसंचालन केले तर गायत्री पाटील यांनी आभार प्रदर्शन करून अध्यक्ष्यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असे सांगून जाहीर करण्यात आले.

