रावेर नगरपालिका निवडणुकीबाबत महाविकास आघाडीची बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी (सिध्दार्थ ढाकणे):  आगामी होऊ घातलेल्या रावेर नगरपालिका निवडणूक आ. शिरीष चौधरींच्या नेतृत्वात लढवण्याचे महाविकास आघाडीने ठरवले असून जागा वाटपा बद्दल लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी, शिवसेना, कॉग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रावेर येथे झालेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले आहे.[ads id="ads2"] 

यावेळी बैठक संपन्न झाल्यावर आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की, नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना एकत्र येऊन लढवण्याचे आम्ही ठरवले आहे. यासाठी अजुन काही बैठका आम्ही घेणार असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले यावेळी पुढे बोलतांना त्यांनी वेगवेगळ्या विषयावर आपले मत व्यक्त केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रर्यत्नशील असणार आहे. न जमल्यास कॉग्रेस सर्व जागा स्वबळावर लढण्यास सक्षम असल्याचे देखिल त्यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष दारा महम्मद, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, शिवसेनेचे जिल्हा संघटक रविंद्र पवार, शिवसेना प्रल्हाद महाजन, राष्ट्रवादी रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, अनिलशेठ अग्रवाल, प्रकाश मुजुमदार, सोपान पाटील, आशिफ मेंबर, ज्ञानेश्वर महाजन, निलकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी, राजेंद्र पाटील,आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!