"डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली शैक्षणिक क्रांती होणे काळाची गरज "--- प्रा.संदीप ढापसे सर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी (दिपक तायडे) येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये भारतीय बौध्द महासभा रावेर शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलतांना प्रा. संदीप धापसे (राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक) यांनी  आवाहन केले. [ads id="ads2"] 

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे होते तर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, सामाजिक कार्यकर्ते गोविंदा लहासे, भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष दिपक तायडे सर, जीवन तायडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांचे हस्ते तथागत भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजा, दीपपूजा व धूपपूजा करण्यात आली.  [ads id="ads1"] 

  पुढे बोलतांना प्रा. धापसे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतातील मूळ असलेला विज्ञानवादी बौध्द धम्म दिला असून त्याचे आपण अनुकरण केल्यास आपली प्रगती कोणीही थांबवू शकत नाही तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा मार्ग अवलंबून आपली प्रगती केली पाहिजे शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली शैक्षणिक क्रांती होणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

         यांनतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ऍड. योगेश गजरे म्हणाले की, शिक्षणाशिवाय आपल्या समाजाला दुसरा पर्याय नाही शिकाल तरच टिकाल. गेल्या काही वर्षांपासून येथिल शैक्षणिक स्तर खालवला आहे पण आजपासून परिवर्तन करा कारण याच वाड्यातील आपले जेष्ठ असलेले अनेक समाज बांधव आज रोजी डॉक्टर, इंजीनीअर, वकील व उच्च अधिकारी पदावर कार्यरत आहेत आणि तीच परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे त्यासाठी माझी तुम्हाला सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी असून येत्या काही दिवसातच या सभागृहात दिपक तायडे सरांनी क्लास सुरु करावे त्यासाठी मी माझेतर्फे स्पर्धा परीक्षेची पुस्तके, बोर्ड व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देतो.

 कार्यक्रमांस समाजातील असंख्य तरुण विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमांची प्रस्तावना दिपक तायडे सरांनी मांडली तर सूत्रसंचालन सम्येक इंगळे यांनी केले आणि आभार गणेश घेटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमण गजरे,जीवन तायडे समता सैनिक शहर प्रमुख,सुमित तायडे, रितेश शिरतुरे, राजदीप तायडे, अंकुश कोचुरे,रुपेश गाढे, मनोज घेटे,अंकुश गजरे, रमण गजरे,रितिक पारधे, रोहित गजरे, सुमेध अटकाळे, करण घेटे, सपकाळे मॅकनिक,अतुल गजरे, स्वप्नील घेटे सर्वजीत घेटे यांनी परिश्रम घेतले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!