रावेर प्रतिनीधी : विजया दशमी हया दिवशी अहिरवाडी गावात देवीचे विसर्जन करण्यात येते त्यानुसार अहिरवाडी गावात विसर्जनाची मिरवणुक काढण्यात आल्या पंरतु एक अति उत्साही मंडळ नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ अहिरवाडी यांच्या कार्यकर्ते यांनी दि १५ आक्टो . २१ संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यत्न अहिरवाडी गावात पारंपारिक विसर्जन मार्गावर मिरवणुक काढून शासनाचे नियमाचे उल्लघन केल्याचे कारणावरून रात्री साडे बारा च्या दरम्यान नव युवक दुर्गा उत्सव मंडळावर व अध्यक्ष उपाध्यक्ष सहीत ४१ सदस्य यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.[ads id="ads2"]
रावेर पोलीस स्टेशन मध्ये CC TN S 350 / 20 21 भादवि कलम १८८, ३४ गुन्हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ [ १ ] [ ३] १३५ प्रमाणे नव युवक दुर्गा उत्सव मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला फीर्याद ही पो कॉ रुपेश डिगंबर तोडकर यांनी दिली आहे तर तपास मा पोलीस निरीक्षक कैलाश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक नितीन डांबरे करीत आहे अहिरवाडी गावात शांतता असुन रावेर पोलीस स्टेशन मधील सर्वमंडळाना एक प्रकारे पी . आय कैलाश नांगरे यांनी कायदयाचे उल्लंघन कराल तर गुन्हा दाखल होणारच इशाराच दिला आहे.