पलक्कड (केरळ): केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कांजीकोडमध्ये आज वार शनिवारी पहाटे लष्कराचा ट्रक दुभाजकावर आदळून उलटला. पोलिसांनी ही माहिती दिली.
[ads id="ads1"]
ट्रकमध्ये प्रवास करणाऱ्या जवानांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ट्रकच्या चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला धडकेपासून वाचवण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना घडली.
[ads id="ads2"] हा ट्रक शेजारच्या तामिळनाडूतील कोईम्बतूरहून तिरुअनंतपुरमकडे जात होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सैन्यात 10 जवान होते. जखमींना शासकीय जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
