यावल वार्ताहर (सुरेश पाटील) एका अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार करून दुखापत केल्याने यावल पो.स्टे.ला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
[ads id="ads1"]
आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मधुकर खांडबहाले हे करीत आहे.
यावल तालुक्यात दहिगाव येथे दि.8/10/2021रोजी दुपारी4:30वाजेच्या सुमारास ही घटना घडली असली तरी आज दि.9/10/2021रोजी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून सकाळी11:30 वाजता तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आला. या घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली यामुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अल्पवयीन मुलीच्या आईने यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. 8/ 10/2021रोजी दुपारी4:30 वाजेच्या सुमारास दहिगाव येथे आरोपी याचे राहते घराच्या मधल्या खोलीत अल्पवयीन मुलगी हिला एकटे बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले
[ads id="ads2"] तसेच तिच्या शरीराला दुखापत केली या कारणावरून तसेच फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला भाग5 गु.र.नं.172/2021भादवि कलम376,376A,375(B),354 बालकांचे लैंगिक अपराधाचे संरक्षण अधिनियम 3(अ),(क),4,8प्रमाणे 25 वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली.
पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मधुकर खांडबहाले हे करीत आहे. या घटनेमुळे दहीगावसह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.