रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे )शहरात आज दिनांक ९ ऑक्टोबर शनिवार रोजी शहरातील छत्रपती शिवाजी चौक , स्वामी विवेकानंद चौक व इमामवाडा या भागात लसीकरण कॅम्प उभारण्यात आले होते.
[ads id="ads1"]
आज पासून या ठिकाणाहून सुरुवात होऊन उद्यापासून संभाजीनगर पाण्याच्या टाकी नगरपालिका ग्रामीण रुग्णालय जवळचा भाग , भोईवाडा . गांधी चौक रावेर , चावडी भाग , बावीसशे गल्ली, विद्या नगर , स्वामी समर्थ मंदीर , शिक्षक कॉलनी , तडवी कॉलनी , अग्रसेन भवन .ईदगाह रोड पंचमुखी हनुमान नगर पाणी फिल्टर प्लांट या भागात लसीकरण कॅम्प होणार आहेत
मिशन कवच कुंडल सुरू केलेले आहेत.१४ ऑक्टोंबर पर्यंत इतर भागांमध्ये लसीकरण होणार असून शहरातील नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सभापती अॅड . सुरज चौधरी यांनी केले.
[ads id="ads2"]
आज दि. ९ ऑक्टोबर पासून ते १४ ऑक्टोबर मिशन कवच – कुंडल सुरू राहाणार असून शहरातील नागरिकांनी लसीकरणासाठी दररोज सुमारे एक हजार कोविड च्या लसी उपलब्ध राहणार आहेत.
दरम्यान रावेर नगरपालिकेचे आरोग्य सभापती सुरज चौधरी प्रदीप महाजन रवींद्र महाजन अक्षय महाजन शिवसेना शहर प्रमुख नितीन महाजन उमेश महाजन रवींद्र पाटील गणू माळी, प्रताप व्यायाम शाळेचे सर्व कार्यकर्ते यांनी भागातील जनतेचे नोंदणी करत लसीकरणासाठी करण्यासाठी मदत केली.