लक्झरी-पिकअपची समोरासमोर धडक ; एक जणांचा जागीच मृत्यू, तीन जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

भुसावळ प्रतिनिधी :  भरधाव लक्झरी व मालवाहु छोटा हत्ती पिकअप वाहनात समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात पिकअप वाहनातील धुळ्याच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन सह प्रवासी जखमी झाले.

राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. सुदैवाने लक्झरी उलटली नाही अन्यथा मोठी जीवीत हानी होण्याची भीती होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"] 

समोरा-समोर धडकली वाहने

  सूत्रांच्या माहितीनुसार, यवतमाळ येथून महेंद्र ट्रॅव्हल्सची लक्झरी (जी.जे.19 एक्स.9596) सुमारे 35 प्रवाशांना घेवून भरधाव वेगाने सुरतकडे निघाली असताना भुसावळ येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ जळगावकडून भुसावळकडे येणार्‍या मालवाहु पिकअप (एम.एच.18 बी.जी.04) वर आदळली. [ads id="ads2"] 

  या अपघातातील पिकअपमधील चालक किशोर निंबा गिरासे (38, नगावबारी, देवपूर, धुळे) हे जागीच ठार झाले तर पिकअपमधील अन्य दोघे जखमी झाले तसेच लक्झरी चालकही जखमी झाला. अपघाताची माहिती कळताच पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत व सहकार्‍यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्याकामी मदत केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!