सिद्धार्थनगर - उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील चिलिया पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी सकाळी नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली.
[ads id='ads1]
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेश चंद रावत यांनी सांगितले की, 55 वर्षीय कामरुज्मा नावाचा माणूस सकाळी नेहमीप्रमाणे मशिदीत नमाज अदा करण्यासाठी आला होता आणि मागून कोणीतरी येऊन त्याला गोळ्या घातल्या आणि त्याचा मृत्यू झाला.
यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.