तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री करणाऱ्या 27 पानटपरीवर कारवाई..

अनामित

वर्धा - राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत तंबाखू नियंत्रण पथकाने तंबाखू, सूपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणा-या 27 पानटपरी कारवाई करुन 5 हजार 400 रुपयाचा दंड वसूल केला.
[ads id="ads1"]सदर कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात दंत शल्य चिकित्सक डॉ. मोहित कोडापे, जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलुजा, समुपदेशक राहुल बुंचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे व अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त जंयत वाणे, किरण गेडाम, राजेश यादव, रमण बावने, संजय धकाते यांनी केली. 
[ads id="ads2"]
 तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार 29 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार तंबाखू, सूपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास, थुंकण्यास व धुम्रपान करण्यास मनाई आहे. आहे. त्यामुळे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत सामान्य रुग्णालय व अन्नऔषध प्रशासन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदर कारवाई करण्यात आली. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!