मुंबई - या वर्षी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवळी उत्साहात साजरी होणार आहे दसरा - दिवाळीच्या आधी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.[ads id="ads1"]
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 11% टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून आता 28% टक्के इतका करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
1 जुलै 2021 पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार असल्याची[ads id="ads2"] सुत्रांकडून मिळालेली माहिती आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत लवकरच आदेश करण्यात येणार आहे.