[ads id="ads2"]
मुंबई प्रतिनिधी (सुशिल कुवर) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी या परीक्षेचा निकाल काल सायंकाळी 7:00 वाजता https//mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सीईटी परीक्षेच्या निकाल संदर्भात राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली होती.
[ads id="ads1"]
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात आलेली MH-CET-2021 या ऑनलाईन प्रवेश परीक्षेत महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी 227 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने 13 दिवसांत 26 सत्रामध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या प्रवेश परीक्षेत च्या पीसीएम ग्रुपच्या विषयामध्ये एकूण 192036 परीक्षार्थी उमेदवार उपस्थित होते. तसेच पीसीबी ग्रुपच्या विषयामध्ये एकूण 222932 परीक्षार्थी उमेदवार उपस्थित होते.
एमएचटी- सीईटी 2021 या गुणवतत्तेच्या आधारे अभियांत्रिकी अभ्यासक्रम, औषधनिर्माणशास्त्र व कृषी विषयक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जातो या परीक्षेचा निकाल दिनांक 27 आँक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 7:00 वाजता जाहीर करण्यात आला असून सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी त्यांचा निकाल त्यांच्या लॉगिन मधून www.mahacet.org आणि https//mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावरून गुणपत्रिका डाउनलोड करता येईल.
एमएचटी सीईटी 2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेच्या पीसीएम गटातून राज्यातून एकूण 11 विद्यार्थी सर्वप्रथम तर पीसीबी गटातून एकूण 17 विद्यार्थी सर्वप्रथम आले आहेत.
या निकाल संदर्भात अधिक माहिती आयुक्त तथा सक्षम अधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
