दुःखद वार्ता : रावेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गणपत रामभाऊ शिंदे यांचे वृद्धपकाळाने निधन

अनामित
[ads id="ads2"]
आपणास कळवण्यात अत्यंत दुःख होते की
रावेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्व.गणपत रामभाऊ शिंदे (वय 80 ) यांचे आज दि.२८/१०/२०२१ गुरुवार सकाळी ४:३० वा वृद्धपकाळाने देवाज्ञा झाली तरी त्यांची अंतिमयात्रा आज दुपारी 12.00 वाजता राहते घर राजे शिवाजी चौक इथून निघेल
                                     
                        -:शोकाकुल:-
                      समस्त शिंदे परिवार

रावेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्व.गणपत रामभाऊ शिंदे (वय 80 ) यांची पालिकेच्या राजकारणात नेहमीच त्यांची भूमिका निर्णायक राहिली. पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे ते दीर्घकाळ चेअरमन होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी बँकेचा शाखा विस्तार आणि बँक जुन्या इमारतीतून नव्या भव्य इमारतीत आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
[ads id="ads1"]
 येथील बाजार समितीचेही सभापती पद त्यांनी भूषवले. सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचे ही ते माजी अध्यक्ष होते. छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेचे ते मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. काहीसे स्पष्टवक्ते परंतु राजकारणात दिलेला शब्द पाळणारे म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या परिवाराला अनुसरून त्यांचे व्यक्तिमत्व धार्मिक-अध्यात्मिक आणि श्रद्धावान होते. आमचे मार्गदर्शक आणि समस्त ब्रह्मवृंदचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार आणि गणपत रामभाऊ शिंदे यांची मैत्री ही राजकारणाच्याही पलीकडे होती. रावेर शहर आणि परिसराच्या राजकारणावर ४०-४५ वर्षे प्रभाव असणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या स्मृतीस आणि कार्यास विनम्र अभिवादन

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!