जळगाव येथे राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)- हटवा दिनानिमित्त १२ राज्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन ; राज्य शासकीय कर्मचारी लोकशाही मार्गाने आक्रमक.

अनामित
[ads id="ads2"]
जळगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत राज्य शासकीय कर्मचारी लोकशाही मार्गाने आक्रमक.

यावल वार्ताहर (सुरेश पाटील) महाराष्ट्र राज्य शासनाने दि.१ नोव्हेंबर २००५ पासून परिभाषित अंशदायी योजना (DCPS) कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. सदर योजनेचे राष्ट्रीय पेंशन योजनेत(NPS)रुपांतर झाले आहे.परंतु संबंधित NPS धारक कर्मचाऱ्यांचे अनुज्ञेय हक्क डावलल्यामुळे आर्थिक दृष्ट्या अतिशय नुकसान होत आहे.सदर योजनेतील सुमारे १६०० कर्मचाऱ्यांचे परिवार आर्थिक बाबतीत संपूर्ण उध्वस्त झाले आहेत.
[ads id="ads1"]
त्यामुळे सदरची योजना रद्दबातल होणे आवश्यक असून कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहे. यासाठी तसेच इतर अनुषंगिक मागण्यांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील १२ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सकाळ सत्रात ठिय्या आंदोलन करुन राज्य सरकारला साकडे घातले.
सदर ठिय्या आंदोलनात
१) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव,
२)महिला व बालविकास अधिकारी, जळगाव, 
३)प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, जळगाव,
४) जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१,सहकारी संस्था, जळगाव, 
५) सह दुय्यम निबंधक वर्ग- जळगाव-३,
६)जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,जळगाव,
७)सह जिल्हानिबंधक वर्ग-१,जळगाव, 
८) जिल्हा माहिती अधिकारी, जळगांव,
९) उपविभागीय कृषी अधिकारी, जळगाव,
१०) तालुका कृषी अधिकारी ,जळगाव,
११) उपवनसंरक्षक, वनविभाग, 
जळगाव या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!