या प्रसंगी संस्थेचे जॉइंट सेक्रेटरी प्रा.मुरलीधर कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती,तसेच सदस्य विजय महाजन हे सुद्धा उपस्थित होते. हे शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. व्ही. दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असून शिबिर संचालनकरिता उपप्राचार्य डॉ व्ही.बी. सुर्यवंशी,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगांव सिनेट सदस्य डॉ.अनिल पाटील ,IQAC समन्वयक डॉ.एस. आर.चौधरी यांची नेमणुक करण्यात आली आहे. [ads id="ads1"]
सदरील विशेष कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबिरात महाविद्यालयातील विदयार्थी व विदयार्थ्यांनी मोठया संख्येने लसीकरण करून घेत आहेत. हे शिबीर २७ ऑक्टोबर २०२१ ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुरु राहणार आहे. या शिबीराची वेळ सकाळी -९ ते १ ही आहे.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचा विदयार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,कार्यलयीन अधीक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय रावेर येथील सर्व आरोग्य सेवक, परिचारिका व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

