शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रावेर तालुक्यातील विविध पक्ष ,संघटनांचा वतीने भाजप विरुद्ध निदर्शने

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) देशभरात होत असलेल्या भ्याड हल्ले आणि शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांच्या विरोधात आज रावेर तालुक्यातील विविध पक्ष संघटनांकडून रावेर तहसिलदार आवारात भाजप पक्षा विरुद्ध निदर्शने करत तहसिलदार कार्यालयामार्फत  राष्ट्रपतीं, व राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्याना निवेदन देवून निषेध नोंदविण्यात आला.[ads id="ads2"]

उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले असून संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व आधार भावाचा कायदा करा या मागण्यासाठी दिल्लीच्या सिमेवर दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा श्री. आशिष मिश्रा टेनी याने व त्याच्या गुंडांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले.[ads id="ads1"]

   देशात शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट घटना आहे.रावेर तालुक्यातील विविध पक्ष व संघटना या क्रूर घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे. संयुक्त किसान मोर्चाने सबंध देशभर या घटनेचा तीव्र धिक्कार करण्यासाठी शांततामय मार्गाने निषेध व्यक्त करण आंदोलने करण्याचे आवाहन केले आहे. रावेर तहसील कार्यालयांवर  निदर्शनांच्या माध्यमातून भाजपप्रणीत भ्याड हल्ल्याचा निषेध करुन रावेर तहसीलदार मार्फत महा महीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद व महामहीम भगतसिंग कोशारी यांना माननीय मुख्यमंत्री महोदय मार्फत निवेदन देण्यात आले .

निवेदनातील मागण्या पुढिलप्रमाणे  -


1)केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. टेनी यांनी राजिनामा  द्यावा. 


२)केंद्रीय राज्य मंत्री चा मुलगा आशिष मिश्रा व त्यांच्या बरोबर हल्ल्यात सामील असणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा व सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करा,


३) मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ५० लाख रुपये मदत व त्यांच्या मुलांना नोकरी  तसेच जखमी शेतकऱ्यांना 25लाख रुपये  नुकसान भरपाई मदत द्यावी. 


4) संविधानिक पदावर असताना लोकांना हिंसा करण्यासाठी भडकवणाऱ्या हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करावे केंद्र सरकारने तीन केंद्रीय कृषी कायदे केले आहेत. 



मोठ्या उद्योगपतींना नफा कमावता यावा यासाठी प्रसंगी शेतकऱ्यांचे बळी घेत केंद्र सरकारला हे कायदे अमलात आणायचे आहेत. मात्र संयुक्त किसान मोर्चा केंद्र सरकारचे हे कुटील कारस्थान कधीही साध्य होऊ देणार नाही. संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती  ने अत्यंत नेटाने लोकशाही चौकटीत व शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. व यापुढे आंदोलन अधिक तीव्र करेल व जोपर्यंत हे तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द केले जात नाहीत व शेतकऱ्यांना शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी किफायतशीर आधारभूत भावाचे संरक्षण देणारा केंद्रीय कायदा केंद्र सरकार करत नाही तोपर्यं हा लढा सनदशीर मार्गाने शेतकरी संघटना सुरूच ठेवतील.त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी आज सर्व पक्षीय पाठिंबा देण्यात येत आहे.तरी शेतकरी हिताचा निर्णय व्हावा अश्या मागणी चे निवेदन देण्यात आले , 

    मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.यांना निवेदन देण्यासाठी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिले.त्या वेळी राजीव पाटील माजी उपाध्यक्ष तालुका ध्यक्ष काँग्रेस ज्ञानेश्वर महाजन तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी निळकंठ चौधरी शिवसेना तालुकाध्यक्ष योगीराज पाटील जिल्हाध्यक्ष किसान सभा सोपान पाटील माजी आमदार अरुणदादा पाटील  माजी जि.प.अध्यक्ष मुरलीधर तायडे ,संंतोष महाजन,महेश लोखंडे, पंकज वाघ ,गणेश बोरनारे ,रामदास लहासे, भरत कुवर,प्रकाश पाटील धनराज पाटील, संजय जमादारस,प्रताप राठोड,प्रकाश खैरे,संदीप सैमिरे,दशरथ जाधव, आर बी महाजन,प्रकाश सुरदास,योगेश पाटील, विनायक महाजन,दिपक पाटील,श्याम राणे, मायाजाल बारी,आयुब मेंबर,नितीन महाजन, अशोकशिंदे,ईमरानखान, भागवत चौधरी,राजु सवर्णे,सावन मेढे,कुणाल महाले, प्रणीत महाजन,सचिन पाटील, ईमरानभाई,सुरेश पाटील,यशवंत धनके, आरीफशेख,हरीषशेठ, मलक गफ्फार,मलक साहिल,गफ्फार तडवी, बबीता तडवी,मानसी पवार ,adv.योगेश गजरे, संरक्षक तायडे,पांडुरंग पाटील ईत्यादने केंद्र सरकार विरोधात घोषणा देवून तहसील परीसर दणाणले होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!