रावेर - विधी सेवा प्राधिकरण, मा. सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार, मा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मा. उच्च न्यायालय, मुबई आदेशान्वय तालुका विधी सेवा समिती रावेर व तालुका वकील संघ, रावेर यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि.०४ ऑक्टोंबर २०२१ लिगल अवेअरनेस व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडुन पुरविल्या जाणा-या सेवांसंदर्भात रावेर शहरात नगरपालिका, रावेर येथे जनजागृतीपर शिबीराचे आयोजन करण्यात आले. [ads id="ads2"]
सदर शिबीरात सामान्य जनतेला पॉम्प्लेट्स वाट्न लिगल अवेअरनेस व महाराष्ट्र राज्य विधा सेवा प्राधिकरणाकडून पुरविल्या जाणा-या सेवांबाबत माहिती पॅनल लॉयर श्री.व्ही. पी महाजन यांचे मार्फत देण्यात आली.[ads id="ads1"]
आयोजित शिबीरासाठी तालुका वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ अॅड.श्री. व्ही. पी. महाजन, रावेर नगरपालिका ओ.एस. श्री. सर्फराज तडवी, कार्यलय अधिक्षक श्री श्यामकांत काळे, श्री.पांडुरंग महाजन, श्री सुभाष महाजन, श्री. युवराज गोयर, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री.दिपक तायडे, श्री.शुभम महाजन, श्री लोकपाल विजय महाजन, आधार केंद्र संचालक श्री.संदिप ताराचंद बारी, श्री नकुल ताराचंद बारी, पॅरा लिगल वॉलेंटीयर्स श्री बाळकृष्ण पाटील, श्री राजेंद्र अटकाळे सौ.सुनिता डेरेकर, बी.यु. पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी वरीष्ठ लिपीक श्री.व्ही. डी. मोरे, श्री भरत सुरेश बारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
