“रावेर यावल तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्प आढावा बैठक” संपन्न

अनामित
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) रावेर यावल तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पाची आढावा बैठक आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य अभियंता व संबंधित सर्वग अधिकारी यांच्या समवेत पार पडली. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हरित क्रांतीचे जनक लोकसेवक माजी मंत्री कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या [ads id="ads2"]
अथक प्रयत्नाने निरुळ पाडल्या पासून ते यावल पर्यंत सातपुडा पायथा 50 किमी अंतरामध्ये गंगापुरी, मंगरूळ, अभोडा, म्हात्रण, कुसुम्बा तलाव, लालमाती, चिंचाटी, लोहारा, सुकी, जानोरी तलाव, मोर, काळाडोह, वड्री, हरिपुरा, निंबादेवी असे 13 लहान मोठी धरणे पूर्ण झालेली आहे. यावर्षी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. उपलब्ध नैसर्गिक जलसंपत्तीचा पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने सदर बैठकीमध्ये खालील प्रमाणे कामे प्रस्तावित करण्यात आली.

1) मोर धरणाचे वाहून जाणारे अतिरिक्त पुराचे पाणी बंदिस्त पाईपलाईने सांगवी नाल्यात टाकणे. 

2) मंगरूळ धरणाचे खाली नदीत बंधारे बांधणे व पाणी कर्जोत नाल्यात टाकणे.

3) गंगापुरी प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी पाडळे पाझर तलावात टाकणे.

4) वड्री ल.पा.तलावाचे अतिरिक्त पाणी शेजारच्या पाझर तलावात टाकणे. अशी कामे नदीजोड प्रकल्प अंतर्गत घेण्याबाबत मा.मुख्य अभियंता यांनी संबंधित लघु पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिल्या. [ads id="ads1"]

हतनूर उजवा कालव्या सहित सर्व प्रकल्पांचे कालवा वितरीकांची कामे रब्बी हंगामाआधी पूर्ण करणे, हतनुर कालव्यावरील बंद उपसा योजनांचे नूतनीकरण प्रस्ताव, सुकी प्रकल्प कालवे नूतनीकरण इ. प्रस्ताव 2 महिन्यात पुर्ण करणे बाबत मुख्य अभियंता सो. यांनी बैठकीत संबंधितांना सूचना दिल्या. 


यावल तालुक्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी शेळगाव प्रकल्प जून 2022 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने बुडीत क्षेत्रातील पुलांची बांधकामे, शेळगाव बामणोद पुलाचे बांधकामास गती देणे, उपलब्ध पाणी साठ्याचा वापर होणेकरिता प्रस्तावित उपसा सिंचन योजना यावल ला मंजुरी मिळवणेकरीता कार्यवाही बाबत चर्चा करण्यात आली.


सदर बैठकीस आमदार श्री शिरीषदादा चौधरी, संजय गांधी योजना समिती अध्यक्ष श्री शेखर पाटील, श्री भानू मेढे, सेवानिवृत्त उपअभियंता श्री के पी पाटील, तसेच तापी महामंडळाचे मुख्य अभियंता श्री बोरकर, अधीक्षक अभियंता श्री भदाणे व श्री दळवी, कार्यकारी अभियंता श्री बेहेरे, श्रीमती कुलकर्णी, श्रीमती ठाकरे, श्री भोसले व संबंधित उपअभियंता उपस्थित होते. तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री तवर साहेब यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठकीमध्ये चर्चा करून प्रस्तावित केलेली कामे 2 महिन्यात पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले.

प्रकल्पाचे व्यवस्थापन व संवर्धन सद्यस्थिती बाबत समाधान व्यक्त करून आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांच्याकडून सर्व उपस्थित अभियंताना नवरात्रीच्या हार्दीक शुभेछा देऊन बैठक संपन्न झाली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!