धक्कादायक रावेर तालुक्यातील वाघोदा खु ,च्या ट्रक चालकाचा खुन ; तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल

अनामित
रावेर - तालुक्यातील  वाघोदा खु, या गावातील वय 35 वर्षीय तरूण याकूब गयासुद्दीन पटेल या ट्रक चालकाचा अखेर खून झाल्याचे उघडकीस झाले असून या गुन्ह्यात सावदा पोलिसांनी आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात यश आले आहे तर दोन पसार झाल्याची सुत्रांची माहिती आहेत , [ads id="ads2"]
तर आरोपी व मयतांमध्ये  दारू पिण्यावरून वाद झाल्यानंतर तिघांनी याकूब गयासुद्दीन पटेल (35) यास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला व संशयीतांनी मृतदेह औरंगाबाद-वैजापूर घाटात मृतदेह फेकून दिल्याची बाब उघडकीस आली आहे. आरोपींविरेाधात सावदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
याकूब गयासुद्दीन पटेल चा खून करून मृतदेह फेकला

रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील रहिवासी याकूब गयासुद्दीन पटेल (35) हा त्याची मालवाहू ट्रक (एम.एच.19 सी.वाय.6843) घेऊन जात असताना 15 मे 2021 सकाळी 10 वाजता ऋषिकेश ऊर्फ माधव विठ्ठलराव शेजवळ (24, रा.दावरवाडी, ता.पैठण, जि.औरंगाबाद), राजू ठेगडे (पूर्ण नाव माहीत नाही, रा.पवन नगर, नाशिक) आणि संजय (पूर्ण नाव माहीत नाही, रा.औरंगाबाद) यांनी संगनमताने करून याकूब पटेल यांचे अपहरण करीत नाशिक एमआयडीसी परीसरात नेले. तेथे तिघांमध्ये दारू पिण्याच्या वादावरून तिघांनी याकुब यांना बेदम मारहाण केली होती. त्याच याकूबचा मृत्यू झाला. त्यानंतर तिघांनी संगनमताने मृतदेह औरंगाबाद-वैजापूर घाटात मृतदेह फेकून दिला.

अखेर उलगडले खुनाचे गुपीत

दरम्यान, याकूब पटेल हे घरी आले नसल्याने सावदा पोलीस ठाण्यात सुरूवातीला मिसींग दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत व मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून याकूब यांच्या संपर्कातील ऋषीकेश शेजवळ याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, राजू ठेगडे (पूर्ण नाव माहीत नाही, रा.पवन नगर, नाशिक) आणि संजय (पूर्ण नाव माहीत नाही, रा.औरंगाबाद)  इतर दोन साथीदारांची नावे सांगितले.


 सावदा पोलिसांनी ऋषीकेशला खाक्या दाखवताच त्याने तिघांनी दारू पिण्याच्या वादातून बेदम मारहाण करून याकूबला ठार केल्याची माहिती दिली व संगनमताने मृतदेह औरंगाबाद-वैजापूर घाटात फेकून दिल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार सावदा पोलिसांनी वैजापूर पोलीसांशी संपर्क साधला असता एकाची अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे सांगण्यात आले. याकूब पटेल यांचा खून केल्याप्रकरणी तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


या प्रकरणातील इतर दोघे अद्याप पसार आहेत. अटक केलेल्या ऋषीकेशला न्यायालयाने 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीसस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, सुरेश आठवले, मोहसीन खान पठाण, विशाल खैरनार यांच्यासह सावदा पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!