तामसवाडी ता.रावेर येथे जिल्हा विधिसेवा प्राधिकरण जनजागृतीपर कार्यक्रम साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधि (राजेश  रायमळे) तामसवाडी ता.रावेर येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण,जळगांव अंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम ग्रामपंचायत तामसवाडी मार्फत ग्रामसेवक यांचे मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.[ads id="ads1"]

याबाबत सविस्तर वृत्त असे की,तामसवाडी ता.रावेर येथे ग्रामसेवक सी.व्ही.चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधिसेवा प्राधिकरण,जळगांव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणालेत की,जिल्हा विधिसेवा प्राधिकरण,जळगांव ची स्थापना लिगल सर्व्हिसेस ऑथाॅरीटी अँक्ट सन १९८७ नुसार झालेली असून मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,जळगांव हे प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष तर वरिष्ठ न्यायाधीश हे सचिव असतात.तसेच जिल्हा विधिसेवा प्राधिकरण तर्फे पुढील प्रमाणे योजना राबविण्यात येतात.[ads id="ads2"]

*गरजु लोकांना मोफत कायदेशीर मदत व सरकारी खर्चाने वकील उपलब्ध करून देणे.

*लोक न्यायालयाचे आयोजन (झटपट तडजोड व दोन्हीही पक्षांना मान्य होईल असा निकाल)

*कारागृहातील पुरूष व महिला कैद्यांना मोफत कायदेशीर मदत 

*विधि संघर्षग्रस्त बालकांना (बालगुन्हेगारांना) मोफत कायदेशीर मदत.

*मध्यस्थता केंद्रा मार्फत आपापसातील वाद समोपचाराने सोडविणे.

*कायदेविषयक शिबीरे/पथनाट्य घेऊन समाजात कायद्याबाबत जनजागृती करणे.

*अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती व जादूटोणा विरोधी कायद्याची माहीती देणे.

*वादपूर्व प्रकरणे उदा.बँकांचे कर्ज प्रकरणे,मोबाईल कंपन्यांचे थकीत बील संबंधित वाद,वीज बिल संबंधित वाद,नगरपालिका कर संबंधिचे वाद समोपचाराने सोडविणे.

*योजना राबविण्यासाठी पँरालिगल व्हाँलेंटीयरची नेमणूक करणे.

*शासनाच्या विविध योजनांची माहीती जनतेपर्यंत पोहोचविणे.

*महिलांच्या विविध कायदेशीर अधिकार,कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण या बाबत जनजागृती करून मदत करणे.

*गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती तसेच बेटी बचाओ बेटी पढावो योजना प्रसार व प्रचार करणे.

*असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्क व अधिकाराबाबत जनजागृती व त्यांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन करणे.

*देह व्यापाराला बळी पडलेल्या महिला व मुली यांना कायदेशीर मदत करून जनजागृती करून त्यांना मदत करणे.

*मनोरुग्ण तसेच मानसिक विकलांग व्यक्तींना औषधोपचार घेण्यासाठी मदत तसेच मोफत कायदेशीर मदत देऊन शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.

*गरिबी निर्मुलन प्रभावी अंमलबजावणी योजनेंतर्गत गरिब व दारिद्र्य रेषेखालील लोकांना रेशनकार्ड/आधार कार्ड इ.शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.

*व्यसनाधीन व अमली पदार्थास बळी पडलेल्या व्यक्तींना कायदेशीर मदत करणे.वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे.

*तृतीय पंथी व्यक्तींना कायदेशीर मदत तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.

*जेष्ठ नागरिक,निराधार,निराश्रित,लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.

*बाल मजुरी प्रतिबंध व बाल कामगार कायद्याबाबत जनजागृती करणे.

*पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करून झाडे लावा.....!झाडे जगवा.....!या ऊपक्रमाद्वारे वृक्षारोपण करणे. 

*रॅगिंग विरोधी कायदा,सायबर गुन्हेगारी व शिक्षणांच्या अधिकाराबाबत जनजागृती करणे.

*एच.आय. व्ही.बाधित व्यकतींच्या अधिकाराबाबत जनजागृती करणे व त्यांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यास मदत करणे.

*मानवाधिकारांबाबत जनजागृती करून मानवाधिकारांचे रक्षण करणे.

इत्यादी योजना राबविण्यात येतात तरी वरील सर्व विषयांशी संबंधित आपणास कुठल्याही प्रकारची कायदेशीर मदत हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून प्राप्त पत्यावर प्रत्यक्ष भेटावे अथवा संपर्क साधावा.त्यासाठीचा पत्ता:- जिल्हा व सत्र न्यायालय आवार,जळगांव.संपर्क:०२५७-२२२१४७४,ईमेल:jalgaondlsa@yahoo.com तसेच रावेर संपर्क क्रमांक:(०२५८४)२५०४३९ सांगितला.

पुढे ग्रामसेवक सी.व्ही.चौधरी म्हणालेत की,सदर विषयाबाबत गावांत दवंडी पेटवून सुध्दा जनजागृती   करण्यात येणार आहे.

यवेळी कायदेविषयक अनमोल मार्गदर्शनाचा लाभ घेणेकामी ग्रामपंचायत सरपंच दिपाली नरेंद्र कोळी,उपसरपंच साजन रमेश चौधरी, जि.प.मराठी मुलांची शाळा तामसवाडी चे मुख्याध्यापक माने गुरूजी,ग्रामपंचायत शिपाई सुकदेव पुंडलिक कोळी दिपक कोळी दैनिक महाराष्ट्र सारथी प्रतिनिधि तामसवाडी राजेश वसंत रायमळे आणि गांवचे पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!