महिलेला बंदुकीचा धाक दाखवून अपहरण ; महिलेचा विनयभंग करून तीन लाख रूपयांची मागणी.

अनामित

राहुरी - तालूक्यातील मुळा धरण परिसरात असलेल्या एका वय ३६ वर्षीय महिलेला बंदूकीचा धाक दाखवत अपहरणा नंतर विनयभंग करून तिच्याकडून तीन लाख रूपयांची मागणी केल्याचे उघडकीस झाले, तर संबंधित या प्रकरणातील आरोपी विरुद्ध वार शुक्रवार दि 1 ऑक्टोबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [ads id='ads1]
  सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी वेळ ०७ : १५ वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरातील ३६ वर्षीय विवाहित महिला एक कार्यक्रम आटपून घरी जात होती.

त्यावेळ आरोपी सुनिल लक्ष्मण लोखंडे (राहणार शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी पुणे) याने राहुरी परिसरात त्या महिलेच्या गाडीला अचानक गाडी आडवी घातली होती. त्यावेळी आरोपी सुनील लोखंडे याने त्या महिलेला बंदूकीचा धाक दाखवून जबरदस्तीने स्वतःच्या गाडीत बसवील आणि तिचे अपहरण केले. [ads id="ads2"]

त्या महिलेस आरोपी म्हणाला तू माझ्याशी बोलत नाहीस. मला का टाळतेस. मला निवांत भेटायला बाहेर का येत नाही. अशी विचारणा केली. तू माझ्या संपर्कात राहून माझ्याशी शारीरीक संबंध ठेव. मला टाळू नकोस. मी सांगेल तेव्हा मला बाहेर भेट. नाहीतर मला पाच लाख रूपये दे. तरच तूझा विषय सोडून देईल.

माझे ऐकले नाहीतर मी तूझी सोशल मीडियावर इज्जत घालून व बदनामी करून तूझे समाज कारण व राजकारण संपवून टाकीन. तू जर माझ्या विरोधात पोलिसात गेली तर तूला व तूझ्या कुटुंबाला संपवून टाकीन. अशी धमकी देऊन त्या महिलेला असे अश्चील वर्तन करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली.

तसेच तिच्याकडून सुनील लोखंडे याने 3 लाख रूपयांची खंडणी बळजबरीने वसूल केली. महिलेने श्रीरामपूर येथील पोलिस ठाण्यात आरोपी सुनील लक्ष्मण लोखंडे याच्या विरोधात आर्म ॲक्ट, अपहरण, विनयभंग तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केलाय. तो गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आहे"

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!