रावेर प्रतिनिधी (सिध्दार्थ ठाकणे) शहरात प्रत्येक शुक्रवारी गरजूंसाठी मोफत खिचडी वाटप करणार असे आवाहन पिंटू वाघ मित्रपरिवाराने केले होते.
[ads id='ads1]
त्यानुसार आज प्रत्यक्षात हा उपक्रम हाती घेत गरीब- गरजूंना मोफत खिचडी वाटप करण्यात आली. या उपक्रमाचा लाभ भुकेपासून वंचित असणाऱ्या अनेक गरजूंनी घेतला.
गोरगरिबांच्या पोटाची भूक संपल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मातृप्ती झाल्याचे समाधान दिसून आले. सदरच्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंटू वाघ मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेऊन गरीब- गरजूंच्या सेवेसाठी व त्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी स्वतः ला समर्पित केले होते.
प्रत्येक शुक्रवारी हा उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प पिंटू वाघ मित्रपरिवाराने केला असून संपूर्ण रावेर तालुक्यात व शहरात पिंटू वाघ मित्रपरिवाराचे या उपक्रमाबद्दल नागरिकांमधून अभिनंदन व कौतुक होत आहे.