मुक्ताईनगर - अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी. करण्यात आले ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष श्री.एस.ए.भोई सर यांचे अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.
[ads id='ads1]
स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह आयुष्याच्या मार्गाने आंदोलन, चलेजाव चळवळ, मिठाचा सत्याग्रह इत्यादी आंदोलने गांधीजींनी उभारली आणि यशस्वी करून दाखवली तसेच शास्त्री यांनी दिलेल्या "जय जवान जय किसान" या मंत्राने सारा देश भारावून गेला होता. साधेपणा आणि मानवतावादी दृष्टिकोनात त्यांनी लोकांची मने जिंकली असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भोईसर यांनी केले.
याप्रसंगी श्री.बी.डी.बारीसर यांनी प्रास्ताविक केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद महाजन यांना जळगाव जिल्हा दूध उत्पादक संस्थेमार्फत दूध उत्पादनात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला म्हणून त्यांचा वाचनालयातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी दूध उत्पादक संस्थेचे व्हॉइस चेअरमन दिनेश पाटील ,अंतुर्ली शहर काँग्रेसचे शेख भैय्या,तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल वाडीले, पिक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन भाऊराव महाजन, पोलीस पाटील किशोर मेढे, फकीरा धायले,भानुदास पाटील, मीडिया प्रतिनिधी शे.शाकीर, ग्रंथपाल मधुकर वानखेडे, अनिल न्हवकर , शांताराम महाजन व मान्यवर वाचक उपस्थित होते.
