बोदवड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका बोदवड यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवण्यात आले असून उपोषणकर्त्यांनी रोजगार सेवकांना शासकीय नोकरीत समाविष्ट करावे त्यासाठी तसेच पगार निश्चित करावा यासाठी उपोषण केले असून
या उपोषणाला पंचायत समिती सभापती किशोर भाऊ गायकवाड माजी सभापती गणेश पाटील जिल्हा परिषद सदस्य पती रामदास भाऊ पाटील प्रहार संघटना तालुका यांच्या पाठिंब्याचे पत्र तसेच वंचित बहुजन आघाडी किसान एकता परिषद दिल्ली जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस विजय चौधरी ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष गोविंद राठोड गजानन घोडेकर तालुकाध्यक्ष टायगर संघटना प्रकाश रामदास घुले ग्रामपंचायत सदस्य घाणखेड मुकेश कराळे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी अध्यक्ष बौद्ध समाज सेवा इत्यादी लोकांनी जाहीर पाठिंबा दर्शवला असून निवेदनावर ती ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका अध्यक्ष समाधान भाऊ शेळके उपाध्यक्ष शंकर गोसावी सचिव सागर शेजवळ युवराज सुरवाडे ने ना भाऊ पाटील सुनील इंगळे अमोल सोनवणे अमोल तायडे रामदास मोरे उपस्थित होते.

