रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास विनंती की, देशात कोविड-19 मुळे 2019/21 या दोन वर्षाच्या शैक्षणिक सत्रात संपुर्ण देशात शाळा बंद असतांना खाजगी शाळा संस्था चालकांनी शाळेची फ़ी मागण्याचा पालकांकडे तगादा लावला आहे.
[ads id='ads1]
तसेच शाळेची फ़ी न भरलेल्या विद्यार्थाना परिक्षेस बसु देणार नाही. असे सागण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे पालक संकटात सापडले आहे. जर संपुर्ण शाळाच बंद आहेत. तर आम्ही फ़ी कशाची देणार ? असे पालकांकडून बोलले जात आहे. तरी ही संस्थाचालक विद्यार्थानकडे फ़ी बाबत सतत मागणी करीत आहे.
या कोविड-19 महामारीच्या काळात शासनाने लक्ष केंद्रीत करुन सन 2019-20-21 या दोन वर्षाची शैक्षणिक फ़ी सरसकट माफ़ करावी या बाबत सरकारने खाजगी शाळा संस्थापकांना जि.आर. काढुन सक्त सुचना कराव्या अशी मागणी रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. मा.मुख्यमंत्री महोदयांना आमच्या भावना कळवाव्या असे आशायाचे निवेदन तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना दिले आहे.
सदर निवेदनाच्या प्रत,मा.गट शिक्षण अधिकारी सो. रावेर, ता.रावेर यांना सविनय सादर तहसिलदार यांना निवेदन देतांना रावेर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बाळु राजाराम शिरतुरे, रावेर तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सलीम शाह यासिन शाह, रावेर तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुरेश कडू अटकाळे, शहर सरचिटणीस मोहम्मंद शाह चाँदशाह, शहर उपाध्यक्ष शेख इम्रान शेख रमजान शहर सचिव सलमान शाह अरमान शाह, शहर उपाध्यक्ष शेख शोहेब शेख गुलाम, नितीन तायडे, कंदरसिंग बारेला, कालु बारेला, अजय तायडे, अनिल प्रभाकर घेटे आदींच्या निवेदनावर सहया आहे.
