लोहारा प्रतिनिधी (हसन तडवी) ता, रावेर येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ कुसुंबा ता रावेर अंतर्गत मौजे गुली लोहारा येथे गुरांची कार्य मोहीम शिबीर घेण्यात आले. रावेर तालुक्यातील लोहारा आदिवासी हे गाव असुन येथे दर वर्षी रावेर तालुक्यातील आजूूबाजूच्या गावातील गुरेढोरे ही चराई साठी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात येत असतात, यात प्रामुख्याने गायी ,वासरे हे मोठ्या संख्येने चराई यासाठी येत असतात.
[ads id='ada1]
काही दिवसांपासून या पशुंवर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा, यासह इतर काही कारणांमुळे त्या गुरांवर वेगवेगळी लक्षणें गौरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेड रावेर तालुका उपाध्यक्ष व ग्रा, प सदस्य महेंद्र पाटील यांच्या नजरेस पडली, त्यातून त्यांची संवेदनशीलता,
[ads id='ads2]
गायी वासरे याविषयीची त्यांची आत्मयीता जागरूक झाली, आणि त्यांनी लगेच सावदा येथिल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राजपूत यांना याविषयीची सविस्तर माहिती दिली, तसेच डॉ राजपूत यांनी ही महेंद्र पाटील यांच्या माहितीला लगेच प्रतिसाद दिला.
ते तातडीने घटनास्थळी पोहोचले व तेथील सर्व गायी, वासरे यांची कर्तव्यदक्षतेने, जबाबदारीने संपूर्णपणे पाहाणी केली .आणि संबंधित लक्षणें यानुसार त्या गुरांवर औषधोपचार सुरू केले, यामुळे सुमारे तीनशे ते साडेतीनशे गायी वासरे यांच्यावर योग्य ती औषधे व उपचार पद्धती केल्या.
डॉ एन जी राजपूत, डॉ के डी बावस्कर, डॉ ए आर, लहासे, अयुब तडवी ,अनित तडवी, विजय तडवी या टीमने औषधोपचार केले. यावेळी लोहारा येथील शेतकरी संजू जमादार ,महेंद्र पाटील, प्रकाश पाटील ,अतुल पाटील, लियाकत जमादार सरपंच लोहारा, बबलू पवार
सह यांनी महेंद्र पाटील गौरखेडा संभाजी ब्रिगेड रावेर तालुका उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांच्या या कार्याचे कौतुक करुन आभार मानले.
